मनपाच्या अंदाजपत्रकावर विभागनिहाय चर्चेला सुरुवात; विकासाला गती देण्याचा निर्धार
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या
अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगाने छत्रपती राजर्षी शाहू
महाराज जिमखाना येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस महापौर विनायक
कोंड्याल, उपमहापौर ज्ञनेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र
काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शहर अध्यक्ष तथा
नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरसेविका
व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या नियोजनानुसार दिनांक २३ मार्च ते २९
मार्च २०२६ या कालावधीत विविध विभागांच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा आयोजित
करण्यात आली आहे.
विभागनिहाय चर्चेचे वेळापत्रक
- २३ मार्च :
- कर आकारणी व कर
संकलन विभाग (सकाळी १० ते १२)
- भूमी व मालमत्ता
विभाग (दुपारी २ ते ६)
- २४ मार्च :
- मंडई व कोंडवाडा
विभाग (सकाळी १० ते १)
- आरोग्य व घनकचरा
व्यवस्थापन विभाग (दुपारी २ ते ६)
- २५ मार्च :
- नगर अभियंता व नगर
रचना (बांधकाम परवाना), विद्युत
विभाग (सकाळी १० ते १२)
- सामान्य प्रशासन
विभाग (दुपारी २ ते ४)
- उद्यान विभाग
(दुपारी ४ ते ६)
- २६ मार्च :
- सार्वजनिक आरोग्य
अभियंता विभाग (सकाळी १० ते २)
- पझोन क्र. १ ते ८
(दुपारी २ ते ६)
- २७ मार्च :
- परिवहन विभाग
(सकाळी १० ते २)
- मनपा प्राथमिक
शिक्षण मंडळ (दुपारी २ ते ६)
- २८ मार्च :
- महिला व बाल कल्याण, मुख्यलेखापरीक्षक, नगरसचिव, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण विभाग
(सकाळी १० ते सायं. ६)
दरम्यान, २३ ते २९ मार्च या कालावधीत दररोज सकाळी
१० वाजल्यापासून बैठका सुरू राहणार आहेत. महापौर विनायक कोंड्याल यांनी मार्गदर्शन
करताना सांगितले की,
“शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे
आहे. प्रत्येक विभागाने पारदर्शकतेने काम करत नागरिकांना उत्तम सुविधा देण्यासाठी
निधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.”
बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित
कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नागरिकाभिमुख धोरणे राबवून
शहर विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.