"पक्षातल्या ‘चहापेक्षा किटली गरम’ सहकाऱ्यांवर रोहित पवारांचा टोला!"

मुंबई | सप्टेंबर २०२५
गेल्या काही दिवसांपासून मुरूम चोरी प्रकरण आणि माढा (सोलापूर) येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा (IPS) यांना केलेल्या फोनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

 रोहित पवारांचे समर्थन
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार म्हणाले –

  • कुर्डुवाडी प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांची भूमिका योग्य होती, पण अजितदादांच्या हिंदी आणि बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज झाला.”
  • अजितदादांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे.”
  • जाणूनबुजून काही कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल सुरू आहे.”
  • मित्रपक्षांच्या नेत्यांवर मीडिया ट्रायल करण्याऐवजी शेतकरी, युवा, महिला सुरक्षा आणि भ्रष्टाचार प्रकरणांवर लक्ष द्यावे.”

 तटकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा?

  • रोहित पवारांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवरही सूचक टीका केली.
  • चहापेक्षा किटली गरम असणारे सहकारी असतील तर आमदार सोबत असूनही सर्व काही आलबेल नसते.”
  • यामुळे पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.