श्रीराम जन्मोत्सव सोहळा नियोजन बैठक पार; नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
सोलापूर : श्रीराम सामाजिक संस्था संचलित श्री हिंदुराष्ट्र
प्रतिष्ठानच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा २०२६
संदर्भात श्रीकृष्ण मंदिर येथे वार्षिक नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नूतन
पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
या संस्थेमार्फत वर्षभर विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम
राबविले जात असून, या बैठकीला मोठ्या संख्येने रामभक्त
उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व नगरसेविका
कांचना यन्नम, कलावती गदगे, दोडमणी,
नगरसेवक अर्जुन जाधव, बसवराज केंगनाळकर,
गज्जम हिरालाल, विनोद भोसले, नागेश खरात, संकेत किल्लेदार यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते. तसेच मार्गदर्शक अजय हक्के, यशवंत पाथरूट आणि
संस्थापक अविनाश मदनावाले यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार
पडली.
नूतन पदाधिकारी
- उत्सव अध्यक्ष : राजन मनसावाले
- उपाध्यक्ष : शेखर स्वामी
- सचिव : राज जगताप, रोहन शिरसीडकर, जयदेव शिवसिंगवाले, ओम जगताप
- सहसचिव : कृष्णा जमादार, देविदास सत्तारवाले, अभिषेक घुले
- कार्याध्यक्ष : अजय गलांडे, अभिषेक कुसमा, नरेश चव्हाण
- खजिनदार : समर्थ उबाळे, समर्थ हंचाटे, अभिषेक नागराळे
- सहखजिनदार : मंजीत मोरे, विशाल गवळी
- पूजा प्रमुख : दिनेश मैनावाले, तिरुमल पुठ्ठा, आशिष कांबळे, मयूर बाडीवाले
- सोशल माध्यम प्रमुख
: स्वप्नील भास्करे, जय जोगी, मयूर
शिंदे
या कार्यक्रमास विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि
कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच, श्रीराम जन्मोत्सव सोहळा यंदा उत्साहात
आणि नियोजनबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.