सोलापूरमध्ये ई-टॉयलेट सुविधा मोफत; महापालिकेचा नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

सोलापूर -- सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने शहरातील ई-टॉयलेट सुविधा अधिक सक्षम करण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उद्यानासमोरील तसेच सात रस्ता, कारगील पेट्रोल पंपाजवळील ई-टॉयलेट नागरिकांसाठी पूर्णतः मोफत करण्यात आले आहेत. या ई-टॉयलेटचे उद्घाटन महापौर श्री. विनायक कोंड्याल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती अध्यक्ष रंजीता चाकोते, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, महेश देवकर,मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे, यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.ही ई-टॉयलेट सुविधा स्वयं-चालित (ऑटोमॅटिक) असून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. नागरिकांना वापर सुलभ व्हावा यासाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रंगसंगती निश्चित करण्यात आली आहे.

तसेच शहरातील सर्व ई-टॉयलेटची नियमित देखभाल व दुरुस्ती करण्यात येणार असून, दिवसातून दोन वेळा साफसफाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहे.महापालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठी मदत होणार असून, नागरिकांनी या सुविधेचा योग्य वापर करून स्वच्छता राखण्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.