शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स ३५८ अंकांनी वधारला; निफ्टीही १०१ अंकांच्या पुढे
भारतीय शेअर बाजार आज अपेक्षेपेक्षा जास्त तेजीने उघडला.
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक वाढीसह व्यवहार
करताना दिसले. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने ओपेक आणि ओपेक+
मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच
इराणमधील तणावामुळे ऊर्जा पुरवठा विस्कळीत झाला असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला
जात आहे. ओपेकमधून यूएई बाहेर पडल्यास तेल उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो,
ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
आशियाई बाजारपेठा
आशियाई बाजारपेठांनी सावध सुरुवात केली.
- दक्षिण कोरियाचा कोस्पी
०.३९% ने घसरला
- कोस्डॅक स्थिर
- हाँगकाँगचा हँग सेंग
फ्युचर्समध्ये किंचित वाढ
- जपानची बाजारपेठ
सुट्टीमुळे बंद
🇺🇸 अमेरिकन बाजारपेठा
मंगळवारी अमेरिकन बाजार घसरणीसह बंद झाले:
- S&P 500 ०.४९% घसरण
- NASDAQ ०.९% घसरण
- Dow Jones ०.०५% घसरण