लालपरीत सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य; महिलां- ज्येष्ठांना आधारऐवजी स्मार्ट कार्डची सक्ती
आधार कार्ड किंवा साधे ओळखपत्र दाखवून निम्म्या तिकिटात
प्रवास करणाऱ्या महिला आणि शंभर टक्के सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना
आता सवलतीसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) अनिवार्य करण्यात आले आहे. या
कार्डशिवाय आता सवलतीच्या लालपरीत प्रवास करणे शक्य होणार नाही.खिशात एनसीएमसी
कार्ड नसेल, तर प्रवाशांना पूर्ण भाडे मोजावे लागणार आहे.
त्यामुळे सुरुवातीच्या काळात प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू
शकतो.
कॅशलेस आणि पारदर्शक व्यवस्था
या निर्णयामागील प्रमुख उद्देश म्हणजे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करणे हा आहे. सवलतीची अचूक नोंद, रोखविरहित व्यवहार आणि शासकीय प्रतिपूर्तीची स्पष्ट प्रक्रिया या सर्व
गोष्टी एकाच स्मार्ट कार्डद्वारे शक्य होणार आहेत. राज्याचे परिवहनमंत्री Pratap
Sarnaik यांच्या पुढाकारातून हा बदल करण्यात आला आहे. कॅशलेस
व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि सवलतींचा गैरवापर रोखणे हेही या निर्णयामागील
उद्दिष्ट असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवाशांनी काय करावे?
सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ
नागरिकांनी लवकरात लवकर एनसीएमसी कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित केंद्रांवर कार्ड नोंदणी व वितरण
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या बदलामुळे सुरुवातीला गैरसोय होण्याची शक्यता
असली तरी दीर्घकालीन दृष्टीने ही प्रणाली अधिक परिणामकारक ठरेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.