“लादलेल्या उमेदवाराला मतदान नको, काम करणाऱ्याला निवडा”; रोहित पवारांचा महायुतीच्या उमेदवाराला टोला
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्या
उपस्थितीत प्रचार बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या
उमेदवार हर्षदा देशमुख जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जयंत आसगावकर
यांच्या प्रचारार्थ ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, उमेदवार निवडताना काम करणाऱ्या व्यक्तीला
प्राधान्य देण्याचे आवाहन केले. “उमेदवारी लादलेल्या उमेदवाराला मतदान नको,
काम करणाऱ्याला मतदान करा,” असा टोला त्यांनी
महायुतीच्या उमेदवाराला लगावला.
महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित
या प्रचार बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे,
जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, काँग्रेसचे
जिल्हाध्यक्ष सातलींग शटगार, सुनीता रोटे, माजी अध्यक्ष भारत जाधव, प्रशांत बाबर आणि चंद्रकांत
पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर
निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित या बैठकीत आमदार रोहित पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचून उमेदवारांची भूमिका मांडणे आणि प्रचाराला गती देणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत.