राज्यातील १२ झेडपी आणि १२५ पं.स.साठी ७०–७५ टक्के मतदान
मुंबई :
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका सोमवारी शांततेत
पार पडल्या. या निवडणुकांसाठी सरासरी ७० ते ७५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक
माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. या निवडणुकीत एकूण ७,४५८
उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. ग्रामीण भागात विशेषतः महिला
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर
सकाळपासूनच रांगा लागलेल्या दिसून आल्या. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी व मतदान
यंत्र बिघाडाच्या तक्रारी आल्या असल्या तरी प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून
मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवली. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी
सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. येथे ७४५ उमेदवारांचे भवितव्य मतदान
यंत्रात बंद झाले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. राज्यभर पोलिस
बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणी सोमवारी पार पडणार असून निकालाकडे सर्वांचे
लक्ष लागले आहे.