सोलापूर शहरात ओला इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी वेळेवर सतर्कता दाखवत मुलासह उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
21-01-2026मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमतासाठी शिंदे गटाची साथ आवश्यक आहे. महापौर पदावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने आले असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.
21-01-2026प्रसिद्ध नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी २७ वर्षांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेनंतर नासामधून निवृत्ती घेतली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील तीन मोहिमा, ६०८ दिवस अंतराळात घालवण्याचा विक्रम आणि अनेक ऐतिहासिक कामगिरीमुळे त्या अंतराळ संशोधनातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरल्या आहेत.
21-01-2026दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने दुसऱ्या दिवशी रायगड–पेण ग्रोथ सेंटर उभारणीसाठी महत्त्वाचा सामंजस्य करार केला. या प्रकल्पातून आधुनिक तंत्रज्ञानासह मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे.
21-01-2026भारताची बॅडमिंटन क्वीन सायना नेहवाल हिने गंभीर गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धात्मक बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायनाने आपल्या गौरवशाली कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
20-01-2026सोलापूर–मुंबई विमानसेवेला मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादानंतर आजपासून सोलापूर–इंदूर विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. स्टार एअरकडून आठवड्यातून तीन दिवस ही सेवा चालवली जाणार असून, व्यापारी व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
20-01-2026